बुध ग्रह हा बुद्धी, व्यक्तिमत्त्वचा कारक ग्रह मानला जातो. त्यानुसार, या जन्मतारखेचे लोक फार निडर स्वभावाचे असतात. हे लोक आपल्या अंदाजाने जगणारे असतात. तसेच, हे लोक लवकरच सगळ्यांमध्ये मिसळतात.
या जन्मतारखेचे लोक फार लवकर इतरांमध्ये मिसळतात. बहुतेकदा हे लोक आपल्या फ्लर्टिंग स्वभावाने ओळखले जातात. यांचा स्वभाव फारच रोमॅंटिक असतो.
या जन्मतारखेचे लोक फार स्वतंत्र विचारांचे असतात. त्यामुळेच यांच्या पहिल्या लग्नात अनेकदा समस्या निर्माण होतात.
अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांना लवकर कोणत्या बंधनात अडकायला आवडत नाही आणि या गडबडीत जर यांचं लग्न जरी झालं तरी त्यात स्थिरता मिळवणं, नातं टिकवणं यांच्यासाठी कठीण होऊन जातं.
मूलांक 1,3 आणि 6 चे लोक यांच्यासाठी चांगले लाईफ पार्टनर ठरु शकतात. यामध्ये मूलांक 2 आणि 7 बरोबर यांचे विचार जुळत नाहीत. यामुळेच नात्यात अनेकदा अडचणी येतात.
या जन्मतारखेचे लोक चांगले बिझनेसमॅन असतात. कारण एखाद्या गोष्टीची रिस्क घेणं आणि आपल्या टॅलेंटने लोकांना प्रभावित करण्यात हे लोक फार तरबेज असतात.