व्यक्तीच्या हाताच्या रेषा वाचून त्यांची लव्ह लाईफ, लग्न, रिलेशनशिप, आरोग्य आणि करिअरचा अंदाज ओळखता येतो.
हाताचं सर्वात छोट्या बोटाखाली आणि हृदय रेषेच्या वर हाताच्या बाहेरील बाजूस आतल्या मार्गाने जाणारी रेषाच लग्न रेषा असते.
ज्या लोकांच्या हातावर अशी रेषा असते त्यांची लव्ह लाईफ, रिलेशनशिप फार रोमॅंटिक असते.
जेव्हा ही रेषा मोठी, स्पष्ट आणि रंगाने गडद होते तेव्हा ती शुभ मानली जाते.
विवाह रेषा हृदय रेषेच्या जवळ असते तर व्यक्तीचं लग्न फार लवकर होण्याची शक्यता असते.
जर तुमची लग्न रेषा छोट्या बोटापासून फार जवळच्या अंतरावर आहे
याचा अर्थ असा होतो की तुमचं लग्न तिशीत किंवा तिशीच्या नंतर होण्याची शक्यता आहे.
जर तुमच्या विवाह रेषेला दुसरी रेषा क्रॉस करत असेल, तर याचा अर्थ तुमच्या विवाहास विलंब किंवा वाद होण्याची शक्यता आहे.
तुमची विवाह रेषा तुटक-तुटक किंवा रंगाने अगदी फिकट आणि स्पष्ट नसेल
तर तुम्हाला आयुष्यात ब्रेकअपचा सामना करावा लागू शकतो.