ज्योतिष शास्त्राप्रमाणेच हस्तरेखा शास्त्राच्या माध्यमातून देखील आयुष्यातील प्रत्येक घटनांच्या बाबतीत माहिती काढता येते.
अनेकदा लोकांना आपलं अफेअर, प्रेम, लग्नाविषयी जाणून घ्यायची उत्सुकता असते.
प्रेम आणि लग्नाच्या बाबतीत हाताच्या तळव्याच्या वरच्या ठिकाणी अनेक रेषांच्या आधारे जाणून घेता येते.
हाताच्या तळव्यावर करंगळीच्या खाली काही छोट्या-छोट्या आडव्या रेषा असतात या विवाहाच्याच रेषा असतात.
जर तुमच्या हाताच्या तळव्यावर छोट्या-छोट्या अशा भरपूर विवाह रेषा असतील तर या व्यक्तींच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता नसते.
जर तुमच्या हातावर एकपेक्षा जास्त विवाह रेषा असतील आणि त्या गडद रंगाच्या असतील तर तुमचे एकपेक्षा जास्त विवाह होण्याची शक्यता असते.
हाताची रेषा सरळ मार्गाने जात असेल आणि त्या मार्गात कोणतेच अडथळे नसतील तर अशा लोकांच्या विवाहात कोणतेच अडथळे येत नाहीत.
जर तुमची विवाह रेषा एखाद्या अन्य रेषेत गुंतली असेल तर तुमचा विवाह अधिक काळ टिकत नाही.
हातावरील विवाह रेषा ठराविक अंतरापर्यंत सरळ आणि नंतर पुसट असेल तर तुमचा घटस्फोट होण्याची शक्यता असते.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)