आपल्यापैकी अनेकजण घरात कुत्रा, मांजर, पोपट, ससा, पक्षी असे अनेक पाळीव प्राणी-पक्षी अगदी आवडीने पाळतात.
यामध्ये अनेकांच्या घरी अगदी सहज मांजर आढळते.
वास्तू शास्त्रानुसार, जर तुमच्या घरी मांजर येऊन जर तिने पिल्लांना जन्म दिला तर ते फार शुभ मानलं जातं.
असं म्हणतात की, पिल्लांच्या जन्माच्या 90 दिवसांच्या आत कुटुंबात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते.
वास्तूशास्त्रानुसार, जर एखाद्याच्या घरात सोनेरी रंगाची मांजर आली तर त्या घराचं लवकरच भाग्य उजळेल असा याचा अर्थ लागतो.
तसेच, मांजर घरात आल्याने सौभाग्य येतं. कुटुंबाची चांगली प्रगती होते. घरात पैशांची भरभराट होते.
तपकिरी रंगाची मांजर आल्यास तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतात. तसेच, अचानक पैशांची आवक वाढते.
सर्वसामान्य मान्यतेनुसार, जर एखादी मांजर अचानक तुमच्या घरात येऊन जर रडत असेल तर काहीतरी अघटित घडणार आहे असे मानले जाते.
मात्र घरात मांजर पाळणं एक प्रकारे अशुभ मानलं जातं. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते असं म्हणतात.
यामुळे पैशांची आवकही होत नाही तसेच आरोग्य देखील चांगलं राहत नाही.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)