अंकशास्त्रानुसार,आपल्या जीवनात आणि करिअरमध्ये मुलांक संख्या महत्तवाची भूमिका बजावतात.
मुलांक संख्या 1 ते 9 पर्यंत असते. जे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या भविष्याची माहिती देते.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या 2 असते.
एकंदरीतच, मूलांक 2 चा मुली कश्या ठरतात आयुष्यात बेस्ट जोडीदार जाणून घेऊयात.
या मुलांकच्या मुली खूप भावनिक आणि प्रेमळ असतात. या मुली कोणावरही जीव ओवाळून टाकतात.
2 मुलांकच्या मुली आपले नातेसंबंध अधिक घट्ट करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.
मूलांक 2 चा मुलींमध्ये एका आदर्श पत्नीचे सर्व गुण असतात.
त्यामुळे लग्नानंतर या मुली लक्ष्मीच्या पाऊलांनी गृहप्रवेश करतात.
त्या आपल्या पतीची नेहमी काळजी घेतात. आपल्या पतीला काहीही कमी पडू देत नाही.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )