हिंदू धर्मात पूर्वजांना देवाप्रमाणेच पूजनीय मानले जाते.



अनेकदा लोक घरातील हॉल, बेडरूम किंवा पूजेच्या खोलीत पूर्वजांचा फोटो लावतात.



घरामध्ये पितरांचे फोटो ठेवण्याचे काही नियम आहेत. या नियमांबद्दल जाणून घेऊयात.



पूर्वजांचा फोटो लावण्याची सर्वात उत्तम दिशा ही दक्षिण दिशा मानली जाते.



दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे घरात या दिशेला पूर्वजांचा फोटो लावा.



अशा प्रकारे पूर्वजांचा चेहरा हा उत्तर दिशेला असेल.



या दिशेला फोटो लावल्याने घरात सुख-समृद्धी कायम राहते.



ब्रह्म स्थानात म्हणजेच घराच्या मध्यभागी पितरांचे फोटो कधीही लावू नयेत. यामुळे मान-सन्मानात तडजोड होते.



शास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो भिंतीवर टांगू नये, हा त्यांचा अपमान मानला जातो.



पूर्वजांच्या फोटोची नेहमी फ्रेम तयार करून शेल्फ किंवा कपाटावर ठेवावीत.



याशिवाय कोणत्याही जिवीत व्यक्तीच्या फोटोच्या बाजूला पितरांचे फोटो लावू नयेत.