मूलांक 4 असलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व खूप खास असतं, त्यांचा स्वभाव एकदम मजेशीर असतो. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. त्यांचा अधिपती ग्रह राहू आहे. अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 चे लोक स्वभावाने एकदम बिनधास्त असतात, ते कशाचीही काळजी करत नाहीत. ते एकदम मस्त मजेत असतात आणि त्यांचा स्वभाव एकदम विनोदी असतो. त्यांना लोकांमध्ये बसल्यावर आनंद वाटतो, चारचौघात बसणं यांना आवडतं. या लोकांना प्रवासाची आवड असते. तसेच, या लोकांना सुखी जीवन जगणं आवडतं. मूलांक 4 चे लोक दिसायला आकर्षक असतात, त्यामुळे त्यांचे अनेक अफेअर असतात. हे लोक अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतात, यात त्यांचा बराच वेळही जातो. या लोकांच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता नसते.