अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 7 असलेल्या लोकांची देखील काही वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 चे लोक आपल्या भावना इतरांसमोर पटकन व्यक्त करत नाहीत. 7, 16 किंवा 25 जन्मतारखेचे लोक फार शांत असतात, मनातील भावना इतरांसमोर ते पटकन व्यक्त करत नाहीत. ज्योतिषशास्त्रात 7 क्रमांकाचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. असं मानलं जातं की, मूलांक 7 चे लोक रहस्यमय, अंतर्मुख आणि बुद्धिमान असतात. मूलांक 7 च्या लोकांना त्यांचं आयुष्य खाजगी ठेवणं आवडतं. (टीप : वरील बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)