ठुशी

ठुशी हा खूप पारंपरिक दागिना आहे, पण तरीही आज प्रत्येक घरात ठुशीच दागिना हा बघायला मिळतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम

बेलपान हार

बेलपान सणाच्या मेळाव्यात आणि पारंपारिक प्रसंगी परिधान केलेला आणखी एक महत्त्वाचा दागिना आहे.

Image Source: instagram\prajktaraj

जोंधळी मणी हार

हा गळ्यात घालण्याचं दागिना आहे. जोंधळ्याचे छोटे छोटे मणी एकत्र करून ही पोत बनवली जाते.

Image Source: instagram\prajktaraj

बोरमाळ

या माळीत लहान बोरांच्या आकारासारखे मणी गुंफले जातात.

Image Source: instagram\prajktaraj

पुतळीहार

पुतळी हार यामध्ये चपटे नाणी लावल्यावर तो पुतळी चपला हार होतो.

Image Source: instagram\prajktaraj

वज्रटिक

यात सोन्याच्या मण्यांच्या तीन रांगा बसवून मध्ये एखादा पदक किंवा स्टोन लावलेला असतो.

Image Source: instagram\prajktaraj

मोहनमाळ

गळ्यात घालत असलेला एक अलंकार जो तीन पदरी असतो.

Image Source: instagram\prajktaraj

चिंचपेटी

चिंचपेटी हा मोत्याचा दागिना गळ्या लगत घातला जातो.हा हार शक्यतो नऊवारी साडी वर घातला जातो.

पिचोडी बांगड्या

हिरव्या रंगाच्या बांगड्या सोबत हा दागिना घातला जातो. याचे वेगळेपण म्हणचे याची एक बाजू प्लेन असते व दुसऱ्या बाजूला डिझाईन केलेली असते.

मासोळ्या

मासोळ्या या पायांच्या बोटात घालतात. लग्न झालेल्या बायका हा दागिना घालतात. हा एक पारंपरिक दागिना आहे.

Image Source: instagram\prajktaraj