शारदीय नवरात्री आणि विजयादशमी झाल्यानंतर वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा म्हणतात. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अर्थात, कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे आपल्याला चंद्र आकाराने मोठा दिसतो. यंदा कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच आज आहे. पंचांगानुसार, या वर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा 16 ऑक्टोबरला, म्हणजेच आज रात्री 8.40 वाजता सुरु होणार आहे. तर, ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4.56 मिनिटांपर्यंत असणार आहे. दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करा. चंद्रोदयानंतर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर दूध किंवा खीरचा नैवेद्य दाखवून कुटुंबातील सदस्यांना दूध प्रसाद म्हणून द्या.