ज्योतिष शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार व्यक्तीच्या स्वभाव आणि स्वभावातील विविध गुणांचा अंदाज लावता येतो.
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला असतो अशा लोकांचा मूलांक 7 आहे.
मूलांक 7 असणार्या लोकांवर केतुचा प्रभाव असतो. यामुळेच त्यांच्या वैवाहिक जीवनावर याचा परिणाम होतो.
अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे देखील गैरसमज वाढतात.
असे लोक आपलं म्हणणं मोकळेपणाने मांडू शकत नाहीत. यामुळेच यांच्या वैवाहिक नात्यात दुरावा निर्माण होतो.
छोट्या-छोट्या कारणांवरून या लोकांच्या आयुष्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते.
यांना कधीच आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हे लोक फार सक्षम असतात.
मूलांक 7 असणारे लोक फार बुद्धिमान असतात. आपल्या मेहनतीने पैसे कमावणं यांना जास्त आवडतं.
मूलांक 7 असणारे लोक फार कमी मैत्री करतात. या लोकांच्या जीवनात सुख-सुविधा असतात.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांची मैत्री मूलांक 5 आणि 6 असणाऱ्या लोकांबरोबर चांगली होते.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)