अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या मूलांकावरुन त्याच्या स्वभावाबद्दलच्या काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
ज्या व्यक्तीचा मूलांक 3 असतो, असे अतिशय घाबरट असतात.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.
3, 12, 21 किंवा 30 जन्मतारखेचे लोक घाबरट असले तरी फार महत्त्वकांक्षी देखील असतात.
आपल्याला हवं ते मिळवण्याची जिद्द या व्यक्तींमध्ये असते.
हे लोक इतरांचा खूप विचार करतात. कोणतीही गोष्ट करताना लोक काय म्हणतील, हा विचार आधी त्यांच्या मनात येतो.
ते सर्वांसमोर शांत राहतात आणि आपली चांगली प्रतिमा बनवतात. हे लोक दुसऱ्यांसमोर आक्षेपार्ह वक्तव्य करत नाहीत.
आपण आक्षेपार्ह बोललो तर समोरचा काय बोलेल, आपल्याला काय समजेल, ही भीती सतत त्यांच्या मनात असते. त्यामुळे हे लोक सांभाळूनच बोलतात.
गरजेच्या वेळी ऑफिसमध्ये सुट्टी हवी असेल, तर ती मागायला देखील हे लोक घाबरतात आणि मुकाट्याने काम करत राहतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.