'या' जन्मतारखेच्या लोकांची सुरु असते नुसती रडारड मूलांक अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेनुसार व्यक्तीच्या मूलांकावरुन त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल सांगितलं आहे. अंकशास्त्रात मूलांक 2 असलेल्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्यं सांगितली गेली आहेत. मूलांक 2 चे लोक प्रचंड रडके असतात, त्यांच्या मनासारखी गोष्ट झाली नाही की ते चिडचिड करतात. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. हे लोक अत्यंत हळव्या स्वभावाचे असतात आणि नको त्या गोष्टींवर रडारड करण्याची सवय यांना असते. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे स्वभावाने ते चंद्रासारखेच कोमल असतात. एखादी गोष्ट बिनसली की त्यांना अश्रू अनावर होतात. कधीकधी एकट्यातच रडत बसण्याची वाईट सवय यांना असते. हे लोक वायफळ गोष्टींचं टेन्शन घेऊन स्वत:ला त्रास करुन घेतात. मूलांक 2 चे लोक हट्टी असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच झाली पाहिजे, असा हट्ट त्यांचा असतो. आपल्याला हवं तसं झालं नाही की ते नाराज होतात. टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.