शरीराच्या 'या' भागावर तीळ अशुभ मानलं जातं. यामुळे आयुष्यभर आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराच्या अंगावरील तीळांचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराच्या काही भागावर तीळ हे सौभाग्याचे प्रतीक असते, तर काही भागावर तीळ अशुभ मानले जाते. समुद्र शास्त्रानुसार, शरीराचे असे काही अवयव आहेत ज्यावर तीळ असणे पुरुषासाठी चांगले मानले जात नाही. एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर तो शुभ मानला जात नाही, असे सामुद्रिक शास्त्रात सांगितले आहे. कपाळाच्या डाव्या बाजूला तीळ असलेले लोक स्वार्थी स्वभावाचे असू शकतात. यामुळे जीवनात अपमान सहन करावा लागतो. समुद्र शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या पाठीवर खांद्याच्या खाली तीळ असेल तर ते शुभ मानले जात नाही. अशा लोकांना यशासाठी खूप संघर्ष करावा लागतो. याशिवाय, अशा लोकांमध्ये आळशीपणा देखील असू शकतो. सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या भुवयाच्या डाव्या बाजूला तीळ असेल तर ते अशुभ मानले जाते. अशा व्यक्तीला, व्यवसाय असो किंवा नोकरी, सर्वत्र वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.