दुसऱ्यांना सहकार्य देण्यात तुम्ही कायम तत्पर राहाल. तुमचा नावलौकिक वाढेल.
कलाकारांची कला समाजापुढे येण्याची संधी मिळेल. लेखकांच्या लिखाणास गती येईल.
तुमच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच गोडवा राहील. व्यवसायात, कामात एक प्रकारची शिस्त असेल.
उत्तम नियोजन कराल. तरुणांच्या आवडीनिवडी बदलत राहतील.
आज बोलण्यात स्पष्टवक्तेपणा राहील. कोणाची पाठीमागून निंदा करू नका.
परखडपणाचे फायदे-तोटे सहन करावे लागतील. कला आणि साहित्य क्षेत्रात चांगली फळं मिळतील.
कोणत्याही क्षेत्रात अति भावनाप्रधान होऊन उपयोग नाही हे लक्षात यायला थोडा वेळ लागेल.
व्यवसाय, नोकरीत तुमच्या मोडी स्वभावाचे दर्शन जवळच्या लोकांना होईल, त्यामुळे तुमच्या वाट्याला जाण्याचे धाडस कोणी करणार नाही.
जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. वैवाहिक जीवनात वैचारिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
एकमेकांमध्ये होणारे गैरसमज दूर करताना नाकी दम येईल. आर्थिक व्यवहाराबाबत फसवणूक होणार नाही ना याची काळजी घ्या.
चारचौघात राहून सुद्धा शांतपणे श्रोत्याची भूमिका घ्याल. महिला धडाडी दाखवतील.
समोरच्या माणसाची तुमच्या बाबतीत नेमकी भूमिका काय आहे हे समजून घेण्यात तुमची बरीच शक्ती खर्च होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.