हिंदू धर्म मान्यतेनुसार, दान करणं हे नेहमीच पुण्याचं कार्य मानलं जातं.
दान केल्याने व्यक्तीचं मन आणि चारित्र्याबद्दल अनेक गोष्टी कळतात.
मात्र दान करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
चाकू, सुई आणि कैची यांसारख्या टोकदार वस्तूंचं दान करु नका.
असे केल्याने दान करणाऱ्याच्या आणि दान घेणाऱ्यात फार गैरसमज निर्माण होतात.
कधीही दान करताना स्टीलची भांडी दान करु नका. यामुळे घरातील सुख-शांती हळूहळू नाहीशी होते.
स्टीलची भांडी दान केल्याने व्यवसायात नुकसानीचा सामना करावा लागतो.
कधीही कोणाला दान करताना शिळं अन्न चुकूनही दान करु नका. यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो.
हिंदू धर्म मान्यतेनुसार, झाडूला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते. यासाठीच कोणालाही दान करताना झाडू दान करु नका.
झाडू दान केल्याने घरात आर्थिक चणचण भासते. इतकंच नाही तर झाडू दान केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )