समुद्र शास्त्रानुसार, शरीरावर तीळ असणे शुभ आणि अशुभ दोन्ही असते.
तीळ व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा तसेच नशिबाबाबत सांगते.
आपण शरीरावर असलेल्या तीळाचे महत्त्व जाणून घेणार आहे.
ज्या व्यक्तीच्या हनुवटीखाली तीळ असते अशा व्यक्ती अतिशय लकी असतात आणि या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत असते.
नाकावर तीळ असलेल्या व्यक्ती स्वच्छ मनाच्या स्वाभिमानी आणि स्वत:च्या कार्यवर विश्वास ठेवणाऱ्या असतात. त्यांना जीवनात यश मिळते.
पाठीवर तीळ असणाऱ्या व्यक्तींना फिरायला खूप आवडते. त्या शिवाय या व्यक्ती रोमँटिक असतात. कुटुंबाची अतिशय काळजी घेतात.
पुरुषांच्या उजव्या तळहातावर आणि स्त्रियांच्या डाव्या तळहातवर तीळ असणे अतिशय शुभ असते. ज्यावेळी आपण हाताची मूठ करतो त्यावेळी तीळ मुठीत येत असेल तर ते व्यक्ती भाग्यदायी असतात.
अशा व्यक्तींना समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळतात. या व्यक्ती अतिशय हसतमुख राहतात. या व्यक्ती पैसे फक्त मौजमजेसाठी पैसे खर्च करतात.
या व्यक्ती जीवनात धनवान आणि यशस्वी असतात. या व्यक्ती कलाकार असतात. बुद्धीच्या जोरावर धन प्राप्त करतात.
दोन भुवयांमध्ये तीळ असणाऱ्या व्यक्ती अतिशय भाग्यशाली असतात. यांचे वैवाहिक जीवन आनंददायी असते. आणि भाग्य नेहमीच साथ देते.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)