आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रिन टाईम कमी करणं गरजेचं आहे.
आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा.
तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. फक्त कोणत्याच प्रकारचा तणाव घेऊ नका.
कोणतीही परिस्थिती आली तरी त्यात लगेच पॅनिक होऊ नका. डोकेदुखीचा थोडासा त्रास जाणवेल.
आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं आरोग्य बिघडू शकतं. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. अन्यथा आजार जास्त वाढू शकतो.
बाहेरचं अन्नपदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतील. जसे की, पिंपल्स, बीपी, मधुमेह अशा अनेक समस्या उद्भवतील.
वातावरणातील बदलामुळे तुम्हाला आज थोडं अस्वस्थ वाटू शकतं. अशा वेळी जास्त दगदग करू नका. शक्य तितकी विश्रांती घ्या.
आज तुम्हाला पोटाशी संबंधित आजार जसे की, पोटदुखी, गॅस यांसारख्या समस्या उदभवू शकतात. त्यामुळे आजच्या दिवशी मसालेदार पदार्थांचं सेवन टाळलं तर बरं होईल.
सततच्या धावपळीमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. यासाठी अधूनमधून विश्रांती घ्या. तरंच तुम्हाला बरं वाटेल.
बदलत्या वातावरणाचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा.
आज तुम्हाला अति तणावामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका.
तुमची तब्येत ठणठणीत असणार आहे. फक्त कोणत्याच गोष्टीचा ताण घेऊ नका.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)