मनी प्लांट कोमेजले किंवा त्याची पाने पिवळी झाल्यास ती त्वरित काढावीत.
त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
मनी प्लांटला सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं.
बेडरुममध्ये मनी प्लांट ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा राहते.
त्याचबरोबर मनी प्लांट ग्रह देखील मजबूत करतो.
मनी प्लांट घरात ठेवल्याने शुक्र ग्रह बळकट होतो.
वाणी, बुद्धी आणि व्यवसायासाठी शुक्र ग्रह महत्त्वाचा मानला जातो.
त्यामुळे मनी प्लांट घरी ठेवणं शुभ असतं.
मनी प्लांट दक्षिण पूर्व दिशा म्हणजेच आग्नेय दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.