व्यवसायात डोळसपणे धोका पत्करावा लागेल. महिलांच्या अपेक्षा पुऱ्या होऊ शकणार नाहीत.
आज सहजासहजी कोणाच्या आहारी जाणार नाही. आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहाल.
साहित्य संशोधक आणि नाविन्यपूर्ण गोष्टी करणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्या संधी मिळतील.
थोडासा अहंकार आणि स्वतःबद्दलच्या अवाजवी कल्पनांना थारा देऊ नका.
तुमच्या लहरी स्वभावामुळे कोणाशी फार काळ टिकून राहणे कठीण होईल.
दुसऱ्यावर टीका करताना ती तुमच्यावरही उलटू शकते याची जाणीव ठेवा.
आज कोणत्याही मायाजाळात अडकू नका. अत्यंत स्वतंत्र वृत्ती आणि हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
महिला इतरांच्या मताची परवा करणार नाहीत, परंतु तुमच्या रसिक वृत्तीचे दर्शन लोकांना घडेल.
सतत कार्यरत राहणे आज तुम्हाला आवडणार आहे, कोणतेही काम मनापासून कराल.
हाती घेतले ते तडीस न्याल. समूहामध्ये राहून आपली आणि दुसऱ्यांचीही कर्मणूक कराल.
तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये पुढे जाता येईल. कोणाच्याही विरोधाला न जुमानता स्वतंत्र वृत्तीने काम कराल.
आवश्यक तेथे लोकांच्या संपर्कात याल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.