एखाद्या भांडखोर व्यक्तीला तुमच्यावर सोपवले तर त्याला तुम्ही बरोबर सरळ कराल.
काढलेली सरकारी कामे मार्गी लागतील. नोकरी व्यवसायात पूर्वी न मिळालेल्या संधी मिळतील.
मेकॅनिक कामाला लागाल. नवीन कामे स्वीकारताना त्यातील तांत्रिक गोष्टींचा अंदाज जरूर घ्या.
तुमच्या निर्णयावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून राहणार आहेत, त्यामुळे विचार करून निर्णय घ्या.
घरामध्ये वाढत्या खर्चामुळे थोडे ताण निर्माण होतील.
कोणत्याही विषयाची प्रतिक्रिया व्यक्त न करता तटस्थ राहणे उत्तम असेल.
नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी जपून बोला, कारण तापटपणा वाढण्याची शक्यता आहे.
तुमची दगदग आणि धावपळ थोडी वाढणार आहे. महिलांची दैनंदिन कामे विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
आज प्रत्येक बाबतीत थोडा उदासीनपणा दिसेल, परंतु राग ताब्यात ठेवणे महत्त्वाचे ठरेल.
नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने चांगले ग्रहमान आहे, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घ्यायला हरकत नाही.
तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडे अडथळे येतील, आळशीपणा सोडावा लागेल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.