नवविवाहितेने सकाळी लवकर उठून लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. चौरंगावर शिवपिंड ठेवावी,त्यानंतर गणपतीचा फोटो ठेवून गणेश पूजन देखील करावं. देवीला विविध झाडांची पानं, फुलं वाहावीत. कणकेच्या दिव्यांची आरास सजवावी. मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगळागौरीचं आवाहन करावं. मंगळागौरीची कहाणी वाचावी. 16 दिव्यांनी आरती करावी. महानैवेद्य अर्पण करावा. सर्व मनोकामना पूर्ण करण्या करता देवीला 3 अर्घ्य द्यावीत. सुवासिनी महिला फुगड्या, झिम्मा, खेळत, गाणी गात मंगळागौर जागवतात.