स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात गाय दिसणे, व्यवसायात प्रगती दर्शवते.
स्वप्नात सिंह दिसल्यास हा राजयोग होण्याचा संकेत आहे.
स्वप्नात माकड दिसल्यास, तुमचे तुमच्या जवळच्या नातेवाईकांशी भांडण होऊ शकते.
स्वप्नात साप पाहण्याचा अर्थ असा की, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये लवकरच यश मिळेल आणि तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकेल.
जर तुम्हाला स्वप्नात कुत्रा दिसला तर, याचा अर्थ तुमचे रखडलेली कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.
जर तुम्हाला स्वप्नात उंदीर दिसला तर, याचा अर्थ लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे.
स्वप्नात घुबड पाहणे, अशुभ संकेत आहे. हे आर्थिक नुकसान दर्शवते.
स्वप्नात मासे दिसणे हा शुभ संकेत असून तुमच्या घरात लवकरच एखादी शुभ घटना घडू शकते.
स्वप्नात सरडा दिसणे हे अचानक भरपूर पैसे मिळण्याचा संकेत आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.