चमत्कार! 2 फुटाची हनुमानाची मूर्ती झाली 12 फुटांची?रहस्य काय?

400 वर्षांपूर्वीची 2 फूट उंच असलेली मूर्ती 12 फुटापर्यंत वाढली, असल्याचं सांगितलं जातं. या मंदिराचं रहस्य जाणून घ्या.

भगवान हनुमान आपल्या भक्तांचे भय आणि संकट दूर करण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ओळखले जातात.

छत्तीसगडमध्ये हनुमानाचं एक चमत्कारी मंदिर आहे, जिथे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

छत्तीसगडच्या कमरौड गावातील हनुमान मंदिरात 400 वर्षे जुनी हनुमानाची मूर्ती स्थापित आहे. इथे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दूरदूरच्या गावांतून आणि अनेक राज्यांतून लोक येथे येतात.

कमरोद गावात एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता. यावेळी त्याच्या नांगराला लागून ही मूर्ती जमिनीतून बाहेर आली.

या स्वयंभू हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करत एक छोटेसे मंदिरही बांधण्यात आले. या मूर्तीची उंची 2 फूट होती.

पण, मंदिर बांधल्यानंतर हळूहळू हनुमानाच्या मूर्तीची उंची वाढू लागली. त्यामुळे मंदिराचे छत तुटले. असे 3 ते 4 वेळा झाले.

हनुमानाची ही मूर्ती सतत वाढत राहिली आणि आता ही मूर्ती 12 फूट उंच झाली आहे. असे म्हणतात की, जेव्हा ही मूर्ती सापडली तेव्हा ती फक्त 2 फूट उंच होती आणि ती हळूहळू वाढत गेली, असं स्थानिक सांगतात.

यानंतर ज्या ठिकाणी ही मूर्ती सापडली त्याच ठिकाणी भाविक आणि देणगीदारांच्या मदतीने भव्य मंदिर बांधण्यात आले, ज्याच्या छताची उंची 28 फूट ठेवण्यात आली.

या मंदिराची ख्याती आता देशभरात पसरली असून देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविक इथे येतात. हळूहळू या मंदिरावरील लोकांची श्रद्धा वाढत आहे.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.