आज कष्टाच्या मानाने लाभ कमीच मिळेल परंतु नावलौकिक प्रतिष्ठेच्या गोष्टी अचानक घर चालत येतील
महिलांना घरातील मोठ्या व्यक्तींचे ऐकावे लागेल. आज कामाची गति मंदावेल.
पटकन निर्णय न घेण्याच्या स्वभावामुळे व्यवहारात इतर लोक तुम्हाला सामावून घेताना खळखळ करतील.
आज राग पटकन येईल. मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल.
कामाच्या बाबतीत एक ना धड भाराभर चिंध्या अशा अनुभव येईल. व्यवहारात पैसे वसूल करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील
घरामध्ये स्त्रियांच्या कारणावरून भांडण तंटे होण्याची शक्यता आहे मानापमानाच्या खोट्या समजुती करून घेऊन वाद वाढवू नका
काही गोष्टी पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने मर्यादा आणणारा योग असल्यामुळे कष्टाला पर्याय नाही
आज स्वतःची प्रगती करून घ्याल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येतील.
आज महिलांनी कोणावरही विश्वास ठेवू नये. कामाच्या बाबतीत सावधानता आणि चिकाटी ठेवणे आवश्यक
आज कामाचे डोंगर उपसाल फक्त जवळच्या व्यक्तींवर नको एवढा विश्वास टाकू नका
वडिलोपार्जित प्रॉपर्टी मुळे निर्माण झालेले वाद विकोपाला जाणार नाहीत याची दक्षता घ्या.
अपेक्षा ठेवल्या नाहीत तर अपेक्षाभंगाचे दुःख जाणवणार नाही.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.