स्वतंत्र विचारसरणीमुळे इतरांशी जमवून घेणे अवघड जाईल.
आर्थिक अडचण थोडी जाणवेल. कुटुंबातील विक्षिप्त स्वभावाच्या माणसाचा थोडा त्रास होईल.
पैसे हातात आल्यामुळे तुम्हाला थोडा अहंकार जाणवेल.
कुटुंबीयांसमवेत प्रवासाला जाण्याचे बेत आखाल.
जी गोष्ट करायला हवी ती न केल्यामुळे लाभ मिळण्यामध्ये थोडी कमतरता जाणवेल.
राजकारणामध्ये असलेल्या लोकांनी आपले पाय रोवण्यासाठी डावपेच खेळायला हरकत नाही.
आपला हेका न सोडल्यामुळे थोडे नुकसान होण्याची शक्यता आहे.
एखादी गोष्ट टोकाची सहन केल्यामुळे थोडा त्रास सहन करावा लागेल.
थोडा सारासार विचार केलात तर कामामध्ये चांगली सुधारणा होईल.
विद्यार्थी वर्ग अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींमध्येही आनंद लुटतील.
एकाग्रता वाढवण्यासाठी थोडी ओंकार साधना उपयोगी पडेल.
घरामध्ये नवीन विचारांचे स्वागत करायला लागेल.