30 ऑगस्ट 2024 आजचे राशीभविष्य

Published by: विनीत वैद्य

मेष रास (Aries)

आपल्या व्यासंगाचा उपयोग करून उत्तम समय सूचकता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर काम पूर्ण कराल.

वृषभ रास (Taurus)

नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र ठराल.

मिथुन रास (Gemini)

हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल.

कर्क रास (Cancer)

तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. तुम्ही केलेल्या प्रत्येक कामामध्ये शिस्त दिसेल.

सिंह रास (Leo)

उथळ पाण्याला खळखळाट फार असतो ही मन लक्षात ठेवून त्याप्रमाणे आजची वागणूक ठेवा.

कन्या रास (Virgo)

लेखक कवी पत्रकारांना चांगले ग्रहमान आहे. मित्रांच्या गोतावळ्यात जास्तीत जास्त राहण्याचा योग आहे.

तूळ रास (Libra)

महिलांनी कडक बोलणे टाळावे. कौटुंबिक सौख्या बाबत तडजोड करावी लागेल.

वृश्चिक रास (Scorpio)

अत्यंत शिस्तीने आणि धोरणी पणाने कामाचे नियोजन करावे लागेल.

धनु रास (Sagittarius)

कुठेही मतभेद झाले तरी समजुतीचे धोरण ठेवावे लागेल.

मकर रास (Capricorn)

नोकरी व्यवसायात आपण करीत असलेल्या कामाची चांगल्या पद्धतीने तपासणी करा.

कुंभ रास (Aquarius)

काहीतरी नवीन करण्याच्या नादात मूळ काम बिघडत नाही ना याचा विचार आवश्य करावा लागेल.

मीन रास (Pisces)

थोडा दूरदर्शीपणा ठेवल्यास फायदा होईल. सूचक स्वप्ने पडतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)