भाद्रपद महिना म्हटला की आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता सर्व भक्तांमध्ये दिसते.
बाप्पाचं आगमन अवघ्या 10 दिवसांवर आहे. 7 सप्टेंबरला घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे.
तुमच्याही घरी यंदा बाप्पाचं आगमन होणार असेल तर अशा वेळी तयारीसाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लागतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
बाप्पाच्या मूर्तीची निवड करताना पर्यावरणपूरक अशीच मूर्ती निवडावी. गणपती बाप्पाची शाडूची मूर्ती किंवा घरी तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती साकारली असेल तर अगदी उत्तम आहे.
पूजेसाठी लागणाऱ्या भांड्यांमध्ये तांब्याचा कलश, फुलपात्र, उदबत्तीघर, तुपाच्या निरांजनी, तेलाचा दिवा किंवा समई, आरतीसाठी घंटा, गणपती बाप्पाला बसायला पाट किंवा चौरंग तुम्ही वापरू शकता.
फुले, समई, ताम्हण, निरंजन, जास्वंदाची फुले, दुर्वा, 21 दुर्वांच्या 10 ते 12 जोड्या, 15 विड्याची पाने, 1 खोबऱ्याची वाटी, 1 तेलाचा दिवा, साखर, दही, दूध, साजूक तूप, मध, 5 फळं, 21 उकडीचे मोदक, कलश, नारळ.
दरवाजाला तोरण, तांदूळ, हळद, कुंकू, लालवस्त्र, पाट, 21 पत्री, 10 मोठ्या सुपाऱ्या, कापसाची वस्त्र, अत्तर, धूप, वाती, फुलवाती, कापूर, काडीपेटी, गूळ, पंचामृत, शंख आणि घंटा या गोष्टी असायला हव्यात.
गणपती बाप्पाला घालायला सुंदर कंठी आणि हार. यामध्ये मोत्यांचे हार किंवा फुलांचे हार किंवा कापसाच्या फुलांच्या कंठीसुद्धा तुम्ही अर्पण शकता.
सगळ्यांमध्ये आपला गणपती बाप्पा उठून दिसेल अशाच मखर आणि सजावटीच्या सामानाची निवड करा.
बाप्पांसाठी कानातले घेताना तुम्ही मोत्यांचे किंवा वेगवेगळ्या खड्यांचे देखणे असे दागिने घेऊ शकता. बाप्पाचा थाट वाढवणारा मुकूटही देखणाच हवा.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)