हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाचं विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला फार पवित्र आणि पूजनीय मानण्यात आलं आहे. तुळशीचं रोप अचानक उपटून काढू नका. तर ते काढण्यापूर्वी स्नान करा तसेच त्यावर थोडं पाणी शिंपडा. तुळशीचं रोप लावल्याने भविष्यात येणाऱ्या अडचणी दूर करता येतात. तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते. तुळशीचं रोप जर घरात वास्तूनुसार लावल्यास आणि त्याची विधिवत पूजा केल्यास भक्तांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते. अनेकदा तुळशीच्या रोपाची योग्य काळजी न घेतल्यास तुळशीचं रोप सुकून जाते. तुळशीचं रोप जर घरात सुकलेलं असेल तर अशा वेळी काही नियम पाळणं गरजेचं आहे. तुळशीचं रोप सूर्य ग्रहण, एकादशी, अमावस्या, चंद्रग्रहण, पौर्णिमा, पितृपक्ष या दिवशी चुकूनही उपटून काढू नये. तुळशीचं रोप फार पवित्र असते.त्यामुळे त्याला कचरापेटीत फेकून देऊ नका.