आज इतरांशी रोखठोक बोलून एक घाव दोन तुकडे करून टाकाल.
एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न कराल.
बरोबरीचे लोक पुढे जात आहेत आणि आपण मात्र आहे तिथेच आहोत हे पाहून निराश व्हाल.
कष्टाला पर्याय नाही हे सूत्र अंगी बाणवून घ्यावे लागेल.
तुमच्या तडफदार व्यक्तिमत्त्वामुळे कामाची गती वाढेल.
उत्तम बुद्धी आणि कल्पकता याच्या जोरावर कामे मार्गी लावाल.
महिला ध्येय ठरवतील, त्याप्रमाणे मार्ग आखतील. आज तुमचा उत्साह चांगला राहील.
संततीच्या तराई वागण्याला तोंड द्यावे लागेल, त्यांना समजून घेता घेताना तुमची मात्र दमछाक होईल.
मन थोडे अशांत राहील. बरोबर काम करणारे सहकारी सुद्धा थोडी आक्रमक भूमिका घेतील.
एखादी परिस्थिती आटोक्यात आणताना सुवर्ण मध्य कसा काढायचा हे चांगले जमेल.
कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना वेगवेगळ्या कल्पना सुचतील.
दुसऱ्याकडून तुम्हाला नक्की काय हवे आहे याचे गणित तुमच्या मनामध्ये तयार असणार आहे.