मेष रास (Aries)

ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी सावध राहून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे औषधं घेणं आवश्यक आहे.

वृषभ रास (Taurus)

तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.

मिथुन रास (Gemini)

आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल.

कर्क रास (Cancer)

आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वातावरण बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लाईट आहारच घ्या.

सिंह रास (Leo)

जर तुम्ही यात्रा करण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्रवास सुखाचा होईल. फक्त मनात भीती ठेवू नका.

कन्या रास (Virgo)

आज तुमची तब्येत सामान्य असणार आहे. तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. फक्त तुमची औषधं वेळेवर घ्या.

तूळ रास (Libra)

जे हृदयरोगी आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला छातीत दुखणं, नैराश्य, अस्वस्थपणा यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

वृश्चिक रास (Scorpio)

महिलांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. सांधेदुखीचा आजार तुम्हाला जास्त त्रास देऊ शकतो.

धनु रास (Sagittarius)

ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहे त्यांना आज अस्वस्थ वाटू शकतं. यासाठी थोडा वेळ आराम करा.

मकर रास (Capricorn)

तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल.

कुंभ (Aquarius)

आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल.

मीन (Pisces)

तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत् आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )