घरातील मोठ्या व्यक्तींना तुमची मते पटणार नाहीत. महिलांच्या दृष्टीने लाभदायक घटना घडतील.
शिष्टाचाराच्या चौकटीत राहून, वास्तवाचे भान ठेवून काम कराल.
जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे वागणूक ठेवा. सरकारी कामे तातडीने उरकून घेतली तर बरे पडेल.
घरातील काही महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा तडीला जाईल. तुमची सुखाची व्याख्या तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल.
वाजवीपेक्षा जास्तच संवेदनशील बनाल. तुमच्या एककल्ली वागण्याचा लोकांना त्रास होईल.
काहीतरी दिव्य भव्य स्वप्न रंगवाल, परंतु तेवढीच कष्टाचीही तयारी ठेवायला हवी.
महिलांचे घरातील मोठ्या व्यक्तींबरोबर जुळणार नाही, तरीही दिवस सुखावह आहे.
पूर्वी ज्या गोष्टी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून केल्या होत्या त्याची फळे आज चाखायला मिळतील.
कष्टाची तमा न बाळगता भरपूर काम कराल. उशीर झाला तर यश तुमचेच आहे हे नक्की.
नव्या कल्पना आकारात येतील. दूरदृष्टीने एखादी गुंतवणूक कराल.
तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कोणताही निर्णय घ्यायला हरकत नाही.
मुक्त शत्रूंच्या लहरी आणि विक्षिप्त वागण्यावर मात कराल.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)