प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 7 असलेल्या लोकांची देखील काही वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. अंकशास्त्रात काही मूलांकांच्या लोकांना फार भाग्यवान समजलं जातं, यामध्ये मूलांक 7 चाही समावेश आहे. मूलांक 7 चा शासक ग्रह गुरू आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुरुचा आशीर्वाद असतो. या मूलांकांचे लोक फार शांत असतात, मनातील भावना इतरांसमोर ते पटकन व्यक्त करत नाहीत. या मूलांकाशी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया. आपल्या भावना इतरांसमोर पटकन व्यक्त करत नाहीत ज्योतिषशास्त्रात 7 क्रमांकाचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. असं मानलं जातं की मूलांक 7 चे लोक रहस्यमय, अंतर्मुख आणि बुद्धिमान असतात. ते त्यांच्या मनातील गोष्टी सहजासहजी कोणाशी शेअर करत नाहीत आणि अनेकदा त्यांचे विचार आणि भावना लपवून ठेवतात. या लोकांना त्यांचं आयुष्य खाजगी ठेवणं आवडतं. त्यांना त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करणं गरजेचं वाटत नाही. स्वतंत्र आणि स्वावलंबी असतात हे लोक हुशार आणि मेहनती असतात टीप : (वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)