आचार्य चाणक्य यांच्यानुसार, घरात घडणाऱ्या काही गोष्टी आर्थिक समस्यांसह अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

जर तुमच्या घरात या गोष्टी होत असतील, तर याचा अर्थ असा की, घरात वाईट काळ सुरू होणार आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते, जर घरात कलहाचं वातावरण असेल आणि भांडणं वाढली असतील, तर ते शुभ लक्षण नाही.

विसंवादाचं वातावरण घरातील आनंद हिरावून घेतं. अशा घरात नेहमीच समस्या निर्माण होतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरामध्ये असं वातावरण असतं, त्या घरात नकारात्मकता कायम असते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, घरामध्ये आई-वडील आणि वडीलधाऱ्यांचा अपमान कधीही करू नये.

आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या घरांमध्ये वडीलधाऱ्यांचा आणि आई-वडिलांचा अपमान केला जातो, त्या घरांमध्ये कधीही समृद्धी येत नाही.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, प्रत्येक घरात देवाचं नाव घेतलं पाहिजे. जिथे ती घेतली जात नाही, तिथे गरिबी राहते.

ज्या घरांमध्ये देवाचं नाव घेणारे लोक नसतात, त्या घरांमध्ये कधीही कृपा होत नाही, अशा घरांमधील सुखशांती संपते.

(टीप : वरील बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून देत आहोत, यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.)