आज कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल.
कामानिमित्त प्रवासाचे योग येतील अतिभावना प्रधानता ठेवलीत तर कामाला गती येणार नाही.
घरामध्ये गैरसमजाचे जाळे पसरे आणि या गोष्टी निस्तरताना नाकी दम येईल.
जवळच्या माणसांची परिस्थिती समजावून घ्यावी लागेल जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल.
आर्थिक घरी बसवण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील महिला तडजोड करतील
बहुतेक गोष्टींमध्ये पहिल्यांदा अपयश आणि नंतर उशीर हे जोडीनेच आल्यामुळे थोडे वैतागून जाल.
आपल्या बरोबरीचे लोक नोकरीमध्ये प्रमोशन घेतात आणि आपण मात्र आहोत तेथे आहोत हे बघून मानसिक त्रास होईल.
संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. मुलांच्या शैक्षणिक करिअर बाबत तडजोड करावी लागेल.
मनासारखी परिस्थिती नसल्यामुळे घरामध्ये ताण-तणाव निर्माण होतील.
आर्थिक बाबतीत कोणतेही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावेत.
तुमच्यातील आत्मसंयम गांभीर्य आज तुम्ही बाजूला ठेवाल आणि वारा येईल तशी पाठ फिरवाल.
जुन्याचा बुरखा टाकून देऊन नवीन गोष्टींची कास धराल. भाग्याची साथ मिळेल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.