असाच एक मूलांक म्हणजे, 9
जर तुमचा जन्म महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 9 असतो.
अंकशास्त्रानुसार, 9 मूलांक असलेल्या लोकांचा स्वामी मंगळ असतो.
9 मूलांक असलेल्या व्यक्ती अत्यंत शिस्तप्रिय असतात. कामाच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा ते सहन करत नाहीत.
स्वामी मंगळ असल्यामुळे या व्यक्तींच्या नाकावर नेहमीच राग असतो.
9 मूलांक असलेल्या व्यक्ती योद्ध्याप्रमाणे असतात, त्या हिमती आणि साहसी असतात.
9 मूलांक असलेले लोक पूर्ण शहानिशा करुन मगच एखाद्याला मदत करतात.
मूलांक नऊ असलेल्या व्यक्तींचं एक मूलांक असलेल्या व्यक्तींसोबत चांगलं जमतं.
मूलांक एक असलेल्यांचा स्वामी सूर्य म्हणजेच, ग्रहांचा राजा असतो आणि मंगळ सेनापती असतो.
मूलांक एक असलेल्या व्यक्तींनी हनुमानाची उपासना करणं फायदेशीर ठरतं.
यामुळे त्यांच्या अडीअडचणी दूर होतात आणि आयुष्य सूकर होतं.
टिप : वरील बाबी केवळ माहिती म्हणून पोहोचवत आहोत. यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.