नवीन प्रॉपर्टी घेण्यासंबंधी काही अडचणी उद्भवतील. तुमच्या अंगातील कला दाखवण्याची संधी मिळेल.
आज कष्टाचे फारसे चीज होणार नाही. वैवाहिक जीवनात तारेवरची कसरत करावी लागेल.
एखाद्या मनाविरुद्ध घडलेल्या घटनेसाठी काळच औषध आहे हे लक्षात ठेवावे लागेल.
करिअरबाबत उदासीन वाटेल, तरी आपले काम चोख बजावाल.
आज शांतपणे काम कराल. वाहने जपून चालवा. व्यवसायात जे काम करत असाल त्यामध्ये एखादे वैगुण्य राहण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ शकतात. घरामध्ये काही व्यक्तींसाठी त्याग करावा लागेल.
आर्थिक स्थिती बरी राहिली तरी ऐपत असूनही काही गोष्टी बाबत उदासीन रहाल.
कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी एरवीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील.
तुमच्या स्वभावामुळे आजूबाजूचे लोक गोंधळून जातील. मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे जास्त निराश व्हाल.
महिलांच्या अपेक्षा पुऱ्या होऊ शकणार नाहीत. कुटुंबातील लोकांना काय हवं नको ते बघाल.
प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. खांदेदुखी, गुडघेदुखी यासाठी औषधे घ्यावी लागतील.
एखाद्या गोष्टीचा मानसिक त्रास किती करून घ्यायचा याचा विचार करा. विद्यार्थी संशोधन क्षेत्रात चमकतील.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.