मेष (Aries Horoscope Today)

व्यवसायात अधिक काम सुरू करा. काम करता करता सुधारणा करता येईल.

Published by: स्नेहल पावनाक

वृषभ (Taurus Horoscope Today)

आजूबाजूच्या जगात व्यवहारांमध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल.

Published by: स्नेहल पावनाक

मिथुन (Gemini Horoscope Today)

घरात आणि घराबाहेर प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे विचार मनात येतील आणि ते विचार अमलातही आणाल.

Published by: स्नेहल पावनाक

कर्क (Cancer Horoscope Today)

विद्यार्थी संशोधन क्षेत्रात चमकतील. आपले छंद गुप्तपणे जोपासण्याकडे तुमचा कल राहील.

Published by: स्नेहल पावनाक

सिंह (Leo Horoscope Today)

नवीन नोकरीमध्ये थोडी खराब परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Published by: स्नेहल पावनाक

कन्या (Virgo Horoscope Today)

प्रकृती चांगली राहिली तरी डोक्यावर ताण येईल, अशा गोष्टींपासून लांब राहणे सोयीस्कर ठरेल.

Published by: स्नेहल पावनाक

तूळ (Libra Horoscope Today)

नोकरी-व्यवसायात उत्कर्षाच्या संधी येतील, पण उथळ पाण्याला खळखळाट फार असतो ही गोष्ट लक्षात ठेवा.

Published by: स्नेहल पावनाक

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

मानापमानाच्या बाबतीत टोकाचे निर्णय घेतले जातील. तुमच्या बुद्धीचा वापर अगदीच जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे राहील.

Published by: स्नेहल पावनाक

धनु (Sagittarius Horoscope Today)

घरामध्ये तातडीची कामे निघाल्यामुळे त्यामध्ये पैसा खर्च होईल.

Published by: स्नेहल पावनाक

मकर (Capricorn Horoscope Today)

एखाद्या गोष्टीतील निष्काळजीपणा थोडा महागात पडेल. जवळच्या लोकांच्या बाबतीतील हटीवादीपणा दुःखाला कारणीभूत ठरू शकतो.

Published by: स्नेहल पावनाक

कुंभ (Aquarius Horoscope Today)
प्रचंड मेहनतीच्या मानाने मामुली यश मिळत असल्यामुळे थोडे निराशेकडे झुकाल.


मीन (Pisces Horoscope Today)
नोकरी-व्यवसायात वाढ करावी किंवा त्याला पूरक असा दुसरा व्यवसाय नोकरी करावी की काय असे विचार मनात येतील.


टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock