मेष रास (Aries)

महिलांना कौटुंबिक स्तरावर बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील. एकावेळी अनेक कामे करू नयेत.

वृषभ रास (Taurus)

वैयक्तिक जीवनात लाभ मिळण्यासाठी उत्तम दिवस.

मिथुन रास (Gemini)

एखादी कृती करण्यासाठी कितीही मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी त्यावर मात करण्याची ताकद तुम्हाला मिळेल.

कर्क रास (Cancer)

चांगल्या वागण्या बोलण्यामुळे आज तुमचा फायदा होणार आहे त्यामुळे बरेच प्रसंग सुसह्य होतील.

सिंह रास (Leo)

तुमची बुद्धी आणि हुशारी वापरून अनेक कामांचा कायापालट करून टाकाल. हाताखालच्या लोकांना समजून घ्यावे लागेल.

कन्या रास (Virgo)

लोकांमध्ये अवगुण शोधून त्यांच्यावर टीका करून आज काहीही साध्य होणार नाही.

तुळ रास (Libra)

तुमची ज्या कामांमध्ये गैरसोय झालेली होती त्यात सुधारणा होईल. एका वेळी अनेक कामे करू नयेत.

वृश्चिक रास (Scorpio)

ज्या कामांमध्ये फायदा आहे त्या कामांमध्ये एकाग्रता वाढवा. तुमच्या औदार्याला सीमा राहणार नाही.

धनु रास (Sagittarius)

तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वाचा आज तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला बराच लोक समुदाय वावरेल.

मकर रास (Capricorn)

आपले वर्चस्व कायम राहिले पाहिजे हा अट्टाहास आज तुमचा राहणार आहे. महिलांचा धार्मिक ते कडे कल राहील.

कुंभ रास (Aquarius)

आज अनेक संधी येतील त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला लागेल. महिला लहरी बनतील.

मीन रास (Pisces)

आज विचारांपेक्षा कृतीला जास्त महत्त्व द्या. एखाद्या गोष्टीचा सर्वांगाने विचार करावा लागेल.