वर्षभरात वेगवेगळ्या नावाच्या एकूण २४ एकादशी असतात.



ही एकादशी आषाढाच्या शुद्ध पक्षात येते म्हणून ह्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले आहे.



आषाढी एकादशी हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे.



आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी,भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमा होतात.



दिंडी,भजन,पूजन,कीर्तन जागरण असे उपक्रम भक्त ह्या दिवशी करतात.



ह्या दिवशी महाराष्ट्रात भक्त विठ्ठलाची पूजा करतात व उपवास ही केला जातो .



आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपवास हा खूप लाभदायक असल्याचे म्हटले जाते.



आषाढी एकादशी दिवशी देव झोपी जातात असं म्हणतात म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हटले जाते.



या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात.



एकादशी उपवासाला राजगिरा, साबुदाणा, बटाटा, रताळे, वरई, शेंगदाणे यापासून तयार केलेल्या पदार्थाचे सेवन केले जाते .