कामाच्या ठिकाणी असलेल्या आनंदाने उत्साही वातावरणामुळे कामाचा फडशा पाडाल.
घरामध्ये मनाजोगती खरेदी कराल. नोकरीमध्ये सवलती मिळतील.
व्यवहारात स्वार्थापोटी काही लोक तुमच्याकडून काम करून घेतील.
घरामधील व्यक्तींचे हट्ट पुरवाल परंतु त्यांच्याकडून तशा अपेक्षाही कराल.
महिलांना घर आणि बाहेरच्या जगात तारेवरची कसरत करावी लागेल.
जगणं समृद्ध करणारे कितीतरी क्षण आज अनुभवाल. पूर्वी पेरलेले असेल ते उगवेल.
स्वप्नाची पूर्तता होईल. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्ती भेटतील.
लोकांसाठी खूप काही करत असताना स्वतःसाठी वेळ काढा.
नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची आवड राहील. त्या इच्छांना आकांक्षाचे पंख मिळतील.
खूप दगदगी मुळे प्रकृतीकडे मात्र लक्ष द्यावे लागेल. आहार विहार व्यायाम यांचे गणित बसवा.
मनस्वास्थ मिळेल. व्यवसायाचा परदेशाशी संबंध असेल त्या कामांना चालना मिळेल.
महिलांच्या लहरी स्वभावामुळे घरामध्ये ताणतणाव निर्माण होतील.
( वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)