वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण 18 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. तथापि, शेवटचं चंद्रग्रहण हे आंशिक असेल, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल. हे चंद्रग्रहण एकूण 4 तास 45 मिनिटं चालणार आहे. या ग्रहणादरम्यान चंद्राचा फक्त एक छोटासा भाग गडद सावलीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, या चंद्रग्रहणाचा काही राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. ज्योतिषी डॉ. अनिश व्यास यांनी सांगितल्याप्रमाणे, हे अर्ध चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने सुतक कालावधी लागू होणार नाही. वर्षातील या दुसऱ्या चंद्रग्रहणाचा भारतात कोणताही परिणाम होणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, उघड्या डोळ्यांनी दिसणारं ग्रहण हाच सुतक काळ मानला जातो.