हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.
आज डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.
आज तुमचे आरोग्य चांगले असणार आहे. मात्र, कामाच्या वाढत्या व्यापामुळे तणाव जाणवू शकतो.
आज तुमच्या शरीरात कॅलरीचे प्रमाण फार वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला सतत अस्वस्थ वाटेल.
तुमच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश जास्तीत जास्त करा. कारण बद्धकोष्ठतेच्या त्रासाने तुम्ही हैराण होऊ शकता.
अगदी थोडीशी समस्या असल्यास, डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही डॉक्टरांच्या संपर्कात राहावं, तुम्हाला कधीही किंवा केव्हाही त्यांच्या सल्लामसलतीची आवश्यकता भासू शकते.
आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.
आज विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल.प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहा.
आज तुम्हाला पोटाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे पौष्टीक पदार्थांचं सेवन करा.
जर तुम्हाला मद्यपान, सिगारेटचं व्यसन असेल तर ते लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमची तब्येत बिघडू शकते.
तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही जास्त वेळ उभं राहून काम करू नये. तुमच्या पाय आणि कंबरेला सूज येऊ शकते, ज्यामुळे तुम्ही खूप काळजीत पडू शकता.
जे लोक पेशाने डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. ऑपरेशन करताना काळजी घ्या.