बौद्धिक बाबतीत आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील.
आज तुमच्यासमोर गुप्त शत्रूंचे काही चालणार नाही. आर्थिक स्थिती सुधारेल.
एखाद्या आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहमान आहे.
घरामध्ये झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीमध्ये सांगितल्याप्रमाणे आचरण करायला लागेल.
ज्या स्त्रियांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी व्यायाम आणि औषधोपचारावर भर द्यावा.
देश तसा वेश घेण्यात पटाईत राहणार आहात. ज्यांना लेखनाची कला अवगत आहे त्यांनी अवश्य लिखाण करावे.
प्रसिद्धीच्या झोतात याल. नोकरी-व्यवसायात भाग्याची साथ मिळेल.
ज्यांना नोकरीत बदल करण्याची इच्छा आहे, त्यांनी अवश्य प्रयत्न करावा. महिला करिअरकडे जास्त लक्ष देतील.
वडिलोपार्जित इस्टेटीच्या कामकाजासाठी एखादी अचानक घटना घडण्याची शक्यता आहे.
आज कामाचा ताण येण्याची शक्यता आहे. जे विद्यार्थी संशोधन क्षेत्रात काम करतात त्यांना नवीन कल्पना सुचतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.