अंकशास्त्रामध्ये प्रत्येक मूलांकाबद्दल विशेष गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांच्या आधारे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे व्यक्तिमत्व जाणून घेता येते.
यामध्ये 5 मूलांक असलेल्या मुली खूप खास मानल्या जातात.
कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.
मुलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रह ज्ञान आणि बुद्धीचं प्रतिक आहे.
बुध ग्रहाच्या प्रभावामुळे हा मुलांक असलेल्या महिला खूप बुद्धिमान आणि निर्भय असतात.
या मुली त्यांचं प्रत्येक काम अतिशय प्रामाणिकपणे करतात.
मूलांक 5 असलेल्या मुली खूप हुशार असतात. या मुली 'ब्युटी विथ ब्रेन' असतात
त्या कोणतंही काम खूप लवकर शिकतात आणि त्यामध्ये तरबेज होतात.
या मुली धैर्यवान आणि मेहनती असतात. मेहनत आणि बुद्धीच्या बळावर या सर्वांच्या मनात खास स्थान निर्माण करतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.