मासिक पाळीत कुंकू लावावं की नाही?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

सुवासिनींसाठी कुंकू म्हणजे, सौभाग्याचं प्रतिक...

शास्त्रांनुसार, विवाहीत महिलांनी कुंकू लावणं त्यांच्या सौभाग्यासाठी उत्तम असतं...

महिलांनी त्यांच्या भांगात भरलेलं कुंकू अखंड सौभाग्याचं प्रतिक मानलं जातं...

हिंदू धर्मात कुंकवाला पवित्र मानलं जातं...

त्यामुळेच विवाहित महिलांनी आपल्या कपाळावर किंवा भांगात कुंकू लावण्याची प्रथा आहे...

उत्तर भारतातील स्त्रिया भांगात कुंकू लावतात... तर जसजसं दक्षिण भारताकडे येतो, तेथील काही राज्यांमधील स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात...

असं म्हटलं जातं की, ज्यावेळी स्त्रियांना मासिक पाळी येते, त्यावेळी त्यांनी कुंकू लावणं शक्यतो टाळावं...


मासिक पाळीशी निगडीत अनेक समज-गैरसमज आपल्या समाजात आहेत...



यामागे असं सांगितलं जातं की, मासिक पाळी येते त्यावेळी महिला अशुद्ध अवस्थेत असतात...


त्यामुळे असं मानलं जातं की, मासिक पाळीत स्त्रियांनी कुंकू लावू नये किंवा त्याला स्पर्शही करू नये...

मासिक पाळीनंतर स्त्रियांनी शारीरिकरुपातून शुद्ध होऊन कुंकू लावावं असं सांगितलं जातं...

पण, या सर्व अख्यायिका आहेत... स्त्रियांना येणाऱ्या मासिक पाळीत काहीच शुद्ध अशुद्ध नसतं...

ही एक नैसर्गिक आणि पूर्णतः आरोग्याशी निगडीत प्रक्रिया आहे... या प्रक्रियेवरच स्त्रियांच्या शरीराचं संपूर्ण चक्र अवलंबून असतं...

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)