काय काम आणि दाम यांचे गणित जमवता जमवता वैयक्तिक जीवनात त्याचे पडसाद खोलवर उठणार आहेत याचा विचार करा.
तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल.
वयस्कर व्यक्तींच्या उपदेशाचा गंभीरपणे विचार कराल घरातील जवळच्या लोकांना हे पटले नाही तरी तुम्ही तुमच्या मताशी ठाम राहाल.
तुमच्या विचारांना एक छानशी शिस्त लागेल त्यासाठी काही गोष्टींचा मनाविरुद्ध का होईना त्याग करावा लागेल.
थोडा दूरदर्शीपणा दाखवल्यामुळे पुढे जाऊन फायदा मिळणार आहे कलाकारांना संधी दार ठोठावतील.
परदेश गमनाच्या संधी घर चालत येतील खूप दिवसांपासून मनात असलेली एखादी गुंतवणूक करण्यास उत्तम काळ.
कोर्ट केसमध्ये मनाप्रमाणे दान पडेल तुमच्या सभोवती असणाऱ्या व्यक्तींचा चेहरा आणि मुखवटा यातील भेद लक्षात येईल.
नोकरीमध्ये मोजकेच काम करा पण ते विंचू कसल्याची खात्री करा. घरामध्ये लहरी मध्यस्थामुळे काही पेच प्रसंग निर्माण होतील.
पैशाबाबत काटेकोर राहाल आणि इतरांनी तसे राहावे अशी तुमची इच्छा राहील.
व्यापार उद्योगात ग्राहकांची गैरसमज होण्याची शक्यता आहे महिलांना बौद्धिक ताण जाणवेल.
मानसिक दृष्ट्या अतिशय नाजूक वळणावर राहणार आहात त्यामुळे थोड्या कारणाने निराश व्हाल.
दुसऱ्यांच्या सुखदुःखात वाजवीपेक्षा जास्त गुरफटल जी गोष्ट करायची ठरवली आहे त्याच्या मागे झपाटल्यासारखे लागाल.