आज देखल्या देवा दंडवत करून आपले प्रश्न सोडवून घ्यावेत. कोणाच्याही अध्यात मध्यात पडू नका.
बुद्धी आणि व्यासंगाच्या जोरावर बरीच कामे पार पडाल फक्त बोलण्यात निश्चितपणा व ठामपणा ठेवायला हवा.
परिस्थितीचे योग्य आकलन करून घ्यावे लागेल.आर्थिक घडी सुधारली तरी निष्काळजीपणा राहणार.
स्वतःबद्दलच्या अवाजवी कल्पना ठेवल्यामुळे नुकसान करून घ्याल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
आहार विहारात नियमितपणा न ठेवल्यास स्वास्थ बिघडेल. महिलांच्या कलेला प्रोत्साहन मिळेल
आज तुम्हाला आव्हानात्मक परिस्थितीशी सामना करावा लागणार आहे. प्रवासाचे बेत आखाल. प्रवासात काळजी घ्या.
प्रकृती सांभाळून प्रवास करावे लागतील. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. लवकरच शुभ कार्यक्रम होतील.
प्रेमवीरांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायद्याचा ठरेल.
आर्थिक चणचण भासणार नाही. ऐन मोक्याच्या वेळी कुठूनही पैसा उभा राहू शकतो.
व्यवसायातील तातडीच्या कामांना गती येईल. नोकरीमध्ये तुमच्या कामांना महत्त्व मिळेल
आज ज्यांच्यावर तुमची मर्जी असेल त्यांना खूप सहकार्य कराल. नव्या कल्पनांची व्यवसायात चांगली मदत होईल.
काम पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान कराल. विचार आणि बुद्धीचा वापर तुमच्या हातून जास्त होईल.
(टीप :वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)