वास्तूशास्त्रात आरश्याच्या दिशेला फार महत्त्व आहे.
वास्तूनुसार आरसा लावल्याने घरात सुख-समृद्धीसह आरोग्यही चांगलं राहते.
घरातील आरसा कधीच एकमेकांसमोर नसावा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते.
झोपताना तुमचा कोणताही अवयव आरश्यात दिसत असल्यास तुम्हाला शरीराविषयी समस्या निर्माण होऊ शकतात.
घरात नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा लावणे योग्य आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
‘उत्तर’ ही कुबेराची दिशा असल्याने या दिशेला घरातील आरसा असल्यास आर्थिक उन्नती होते.
आरसा तिजोरीसमोर लावला तर ते शुभ मानले जाते.
घरातील आरसा हा नेहमी चौकोन किंवा आयताकार आकाराचा असावा.
घरात दक्षिण आणि पश्चिम दिशेला आरसा लावल्यास कौटुंबिक त्रास वाढण्याची शक्यता असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)