आज जे-जे अवघड आहे, ते सोपे करून काम कराल.
लांबच्या प्रवासाचे योग येतील. स्थावर इस्टेटिसंबंधीचे व्यवहार काही कारणामुळे रखडतील.
कामाचा लाभ मिळेल परंतु त्यासाठी थोडा मानसिक त्रासही सहन करावा लागेल.
विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल फक्त एकाग्रता थोडी कमी पडेल.
वैवाहिक जीवनात समजुतीचे वारे वाहतील. महिलांनी स्वतंत्र वृत्तीला आळा घालावा.
आज दिवस आनंदात जाईल आर्थिक स्थिती सुधारेल.
बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे हातात पडतील संशोधन क्षेत्रात यश मिळेल.
एखादी गोष्ट दुसऱ्याने सांगितली म्हणून मान्य करू नका स्वतः विचार करा.
स्वतःच्या बुद्धीच्या परिसावर घासून तिचा कस लावण्याची सवय तुमच्या कामाला न्याय देणारी ठरेल.
घरापासून लांब राहण्याचे योग येतील प्रकृतीला मात्र सांभाळा.
श्वसनाचे विकार पाठीचे दुखणे असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
कर्तव्य आणि शिस्त यांना धरून राहिलात तर कोणालाही घाबरायचे कारण नाही.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.